सायबर गुन्हेगारी, पुरावे हस्तांतरणाबाबत सीबीआय-एफबीआयमध्ये चर्चा

आंतरराष्ट्रीय गुन्हयांचा छडा लावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढायला अत्याधुनिक तंत्रज्ञान व विशेषज्ञता यांची माहिती एकमेकांना देण्याबाबत चर्चा झाली.
सायबर गुन्हेगारी, पुरावे हस्तांतरणाबाबत सीबीआय-एफबीआयमध्ये चर्चा
Published on

नवी दिल्ली : अमेरिकेच्या एफबीआय या गुप्तचर संस्थेचे संचालक ख्रिस्तोफर वॅरे यांनी सीबीआयचे संचालक प्रवीण सूद यांची भेट घेतली. सायबर गुन्हेगारी, पुरावे हस्तांतरण यांच्याशी संबंधित दोन्ही देशांमध्ये समन्वय साधण्याबाबत चर्चा झाली. वित्तीय गुन्हेगारी व गुन्हेगारांना सुपूर्द करण्यासाठी पुराव्यांच्या हस्तांतरणाबाबत त्यांच्यात चर्चा झाली.

एफबीआय या गुप्तचर संस्थेचे संचालक ख्रिस्तोफर वॅरे हे दोन दिवसांच्या भारतीय दौऱ्यावर आले आहेत. ते या दौऱ्यात भारताच्या वरिष्ठ सुरक्षा व तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत. वॅरे व त्यांच्यासह आलेल्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी सीबीआयच्या संचालकांची भेट घेतली. संघटित गुन्हेगारांचे नेटवर्क, सायबर धोका, आर्थिक गुन्हे आदींवर चर्चा झाली. दोन्ही देशांच्या तपास संस्थांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुरावे हस्तांतरण वेगाने करावे, गुन्हेगार व फरारी आरोपींना न्यायालयात हजर करून त्वरित हे खटले निकाली काढण्यासाठी सहाय्यता करण्याबाबत चर्चा झाली. एफबीआय अकादमी, क्वांटिको व सीबीआय अकादमी, गाझियाबाद यांच्या सर्वोत्तम तंत्रज्ञान व कारवाईबाबत परस्पर सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली.

आंतरराष्ट्रीय गुन्हयांचा छडा लावण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढायला अत्याधुनिक तंत्रज्ञान व विशेषज्ञता यांची माहिती एकमेकांना देण्याबाबत चर्चा झाली.

logo
marathi.freepressjournal.in