‘नीरी‘च्या माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे

‘सीएसआयआर-नीरी’चे माजी संचालक राकेशकुमार आणि त्याच संस्थेतील अन्य चार शास्त्रज्ञांविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचार आणि प्रकल्प बहाल करण्यासाठी खासगी कंपन्यांवर केलेल्या मेहेरनजरप्रकरणी गुन्हे नोंदविले आहेत.
‘नीरी‘च्या माजी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे
PTI Photo/Ravi Choudhary
Published on

नवी दिल्ली : ‘सीएसआयआर-नीरी’चे माजी संचालक राकेशकुमार आणि त्याच संस्थेतील अन्य चार शास्त्रज्ञांविरुद्ध सीबीआयने भ्रष्टाचार आणि प्रकल्प बहाल करण्यासाठी खासगी कंपन्यांवर केलेल्या मेहेरनजरप्रकरणी गुन्हे नोंदविले आहेत. सीबीआयने बुधवारी महाराष्ट्रासह हरयाणा, बिहार आणि दिल्ली येथील १७ ठिकाणी छापे टाकले आणि गुन्ह्याशी व मालमत्तेशी संबंधित दस्तऐवज आणि दागिने जप्त केले. ‘सीएसआयआर’च्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांनी केलेल्या फौजदारी कारस्थान आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींवरून सीबीआयने ही कारवाई केली आहे. ‘नीरी’चे माजी संचालक राकेशकुमार, मुख्य शास्त्रज्ञ अत्या कपले आणि संजीवकुमार गोयल, प्रधान शास्त्रज्ञ रितेश विजय आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुनील गुलिया यांच्याविरुद्ध दक्षता अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणात त्यांच्यावरुद्ध तीन एफआयआर नोंदविण्यात आले होते.

गोयल आणि गुलिया या सरकारी अधिकाऱ्यांनी आरोपी कंपन्यांशी संगनमत करून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला आणि या कंपन्यांकडून लाभ उकळला. वायू शुद्धिकरण या अत्यंत मोठ्या 'वायू' प्रकल्पाचाही यामध्ये समावेश आहे. अन्य एका प्रकरणात राकेशकुमार आणि कपले त्याचप्रमाणे अलकनंदा टेक्नॉलॉजीज प्रा. लि., एनव्हायरो पॉलिसी रिसर्च इंडिया प्रा. लि. आणि एनर्जी एनव्हायरो प्रा. लि. यांच्यविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in