खासदार महुआ मोईत्रांची सीबीआयची चौकशी सुरू

ओम बिर्ला यांनी हे प्रकरण नैतिक समितीकडे पाठवली. दुबे यांनी लोकपालाकडे ही तक्रार दाखल केली होती.
खासदार महुआ मोईत्रांची सीबीआयची चौकशी सुरू

नवी दिल्ली : तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा लाच प्रकरणात आता सीबीआयचा प्रवेश झाला आहे. मोईत्रा यांच्याविरोधात सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

लोकपाल यांच्या आदेशावरून सीबीआयने प्राथमिक चौकशी सुरू केली. या चौकशीनंतर महुआ यांच्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय घेतला जाईल.

प्राथमिक चौकशीनुसार, सीबीआय कोणत्याही आरोपीला अटक किंवा त्याची झडती घेऊ शकत नाही. मात्र, ते माहिती मागू व कागदपत्रांची छाननी करू शकतात. तसेच ते मोईत्रा यांची चौकशी करू शकतात. हा तपास लोकपालांच्या आदेशाने सुरू झाला असल्याने त्याचा अहवाल लोकपालाला सोपवला जाईल.

सुप्रीम कोर्टाचे वकील जय देहाद्राई यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. त्यात म्हटले होती की, मोईत्रा यांनी संसदेत प्रश्न विचारायला उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून लाच घेतली होती.

देहाद्राई यांनी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना पत्र लिहिले होते. त्यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे प्रकरण नैतिक समितीकडे पाठवली. दुबे यांनी लोकपालाकडे ही तक्रार दाखल केली होती.

logo
marathi.freepressjournal.in