कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

गुन्हा दाखल झाल्यावर १७ मे रोजी झाडाझडतीदरम्यान कार्ती यांच्या घरातील एक भाग सील करण्यात आला होता.
कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानी सीबीआयची छापेमारी

काँग्रेस नेते कार्ती चिदंबरम यांच्या निवासस्थानी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) छापेमारी केली आहे. कार्ती चिदंबरम यांच्या चेन्नई येथील निवासस्थानी घरी सीबीआयचे अधिकारी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. २५० चिनी नागरिकांना व्हिसा देण्यासाठी ५० लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाल्यावर १७ मे रोजी झाडाझडतीदरम्यान कार्ती यांच्या घरातील एक भाग सील करण्यात आला होता. त्यावेळी त्यांची पत्नी परदेशात असल्यामुळे या ठिकाणच्या चाव्या तिच्याकडे होत्या.्यामुळे पुन्हा एकदा सीबीआयने छापेमारी केली आहे. यापूर्वीही कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित ९ ठिकाणांवर सीबीआयने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर मे महिन्यात याच प्रकरणी ईडीनेही कार्ती चिदंबरम यांच्यावर मनीलाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. चिदंबरम यांच्या महत्वाच्या ९ ठिकाणांवर कारवाई केल्यानंतर त्यांचे निकटवर्तीय भास्कर रमण यांना व्हिसा भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. दरम्यान, यापूर्वीही लाखो रुपये घेऊन व्हिसा तयार करण्याच्या प्रकरणात सीबीआयने कार्ती चिदंबरम यांच्याशी संबंधित मालमत्तांवर कारवाई केली होती. कार्ती चिदंबरम यांनी चिनी कंपन्यांमधील लोकांना आपली खास ओळख वापरून व्हिसा दिल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in