नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे गुजरातमधील सात ठिकाणी छापे

नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकले आहेत.
नीट पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे गुजरातमधील सात ठिकाणी छापे
स्क्रीनशॉट, एक्स @NCMIndiaa

नवी दिल्ली : नीट-यूजी पेपरफुटीप्रकरणी सीबीआयने गुजरातमधील सात ठिकाणी छापे टाकले आहेत. आणंद, खेडा, अहमदाबाद आणि गोध्रा येथे संशयितांच्या संकुलांवर शनिवारी सकाळपासून छापे टाकण्यात येत आहेत.

प्राचार्य-उपप्राचार्य, पत्रकार अटकेत

दरम्यान, सीबीआयने शुक्रवारी ‘नीट’ पेपरफुटीप्रकरणी झारखंडच्या हजारीबाग येथील एका शाळेच्या प्राचार्य आणि उपप्राचार्यांना त्याचप्रमाणे हिंदी दैनिकाच्या एका पत्रकाराला अटक केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ओॲसिस शाळेचे प्राचार्य एहसानुल हक आणि उपप्राचार्य इम्तियाज आलम यांना अटक करण्यात आली आहे. जमामुद्दीन अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या पत्रकाराचे नाव आहे.

logo
marathi.freepressjournal.in