माजी मुख्यमंत्री राबडी देवींच्या घरावर सीबीआयचे छापे; 'हे' आहेत आरोप

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
माजी मुख्यमंत्री राबडी देवींच्या घरावर सीबीआयचे छापे; 'हे' आहेत आरोप
Published on

आज सीबीआयने बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या सरकारी निवासस्थानावर छापे टाकले. यामुळे आता बिहारचे राजकीय वातावरण तापले आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी देवी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

सीबीआयने या प्रकरणामध्ये यापूर्वी लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मिसा भारती यांच्यासह १४ जणांना समन्स पाठवले होते. यामध्ये त्यांना १५ मार्चला हजर राहण्यास सांगितले होते. हे प्रकरण तसेच १४ वर्ष जुने असून लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जमिनीच्या बदल्यात ७ जणांना रेल्वेमध्ये नोकरी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यापैकी ५ जमीनीची विक्री झाली होती, तर २ लालू प्रसाद यादव यांना भेट म्हणून देण्यात आल्या होत्या, असा आरोप आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये सीबीआय त्यांच्यावर काय कारवाई करते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

logo
marathi.freepressjournal.in