सीबीएससी दहावी परीक्षेच्या तारखा जाहीर

देशभरातील सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.
सीबीएससी दहावी परीक्षेच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएससी) १०वी आणि १२वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. १५ फेब्रुवारी २०२४ पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे, तर १२वीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन २ एप्रिलला संपणार आहे.

सीबीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांना ही डेटाशीट तपासता येणार आहे. १५ फेब्रुवारी २०२४ रोजी दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून ती १३ मार्च २०२४ पर्यंत चालणार आहे. सीबीएसईच्या परीक्षा सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत होतील. देशभरातील सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.

बोर्डाच्या परीक्षेपूर्वी होणाऱ्या प्रॅक्टिकल परीक्षांच्या तारखाही आधीच जाहीर झाल्या होत्या. १०वी आणि १२वी या दोन्ही वर्गांच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ जानेवारी ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in