CBSE बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसईने 10वी आणि त्यानंतर 12वीचा निकाल जाहीर केला आहे. दहावीच्या परीक्षेत एकूण ९३.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
परीक्षेला बसलेले उमेदवार या वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि आईचे नाव यासारखे तपशील प्रविष्ट करावे लागतील. यानंतर निकाल तपासता येईल.
कसा पाहाल निकाल ?
निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट म्हणजे cbse.gov.in वर जा.
येथे होमपेजवर निकालाची लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा. म्हणजे CBSE 10वी निकाल 2023 लिंकवर.
उमेदवारांना या पृष्ठावर त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करावे लागतील.
रोल नंबर आणि डीओबी सारखे तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट बटण दाबा.
निकाल तुमच्या समोर असेल