२२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका, या दिवशी घराघरात दिवाळी साजरी करा; मोदींचे जनतेला आवाहन

महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट, अमृत भारत एक्स्प्रेसला पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
२२ जानेवारीला अयोध्येत येऊ नका, या दिवशी घराघरात दिवाळी साजरी करा; मोदींचे जनतेला आवाहन

गिरीश चित्रे

अयोध्या नगरी : अयोध्या नगरीत पुरुषोत्तम रामलल्लाचे भव्यदिव्य मंदिर उभारले जात आहे. अयोध्या ते बायपास नाक्याजवळील महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअर पोर्टचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी झाले. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना हा ऐतिहासिक क्षण आपल्या सगळ्यांच्या जीवनात भाग्याचा दिवस आहे. २२ जानेवारीला रामलल्लाच्या मंदिराचे उद्घाटन होणार असून त्यादिवशी घराघरात राम ज्योत प्रज्वलित करावी, असे आवाहन भारतीय जनतेला मोदी यांनी यावेळी केले. तसेच रामभक्तांनी २३ जानेवारीनंतर रामलल्लाच्या दर्शनाला यावे, असे आवाहनही त्यांनी केले. अयोध्या धाम जंक्शन स्थानकाचा पुनर्विकास झाला असून अद्ययावत सुसज्ज अयोध्या धाम, मृत भारत एक्स्प्रेस, वंदे भारत एक्स्प्रेसला मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबाई पटेल, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित होते. अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येत असून अयोध्या पावन झाली. अयोध्येत येणाऱ्या भक्तांसाठी अयोध्या धाम जंक्शन ते आनंद थेट जोडली जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘आमचे सरकार जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी, कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि भगवान श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी कटिबद्ध आहे. याच पार्श्वभूमीवर नव्याने बांधलेल्या विमानतळाचे आणि पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे अयोध्या, उत्तर प्रदेश आणि देशातील अनेक भागातील देशवासीयांचे जीवन सुसह्य होणार आहे.’’

दरम्यान, अयोध्या धाम जंक्शन स्थानकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. यावेळी उत्तर प्रदेशातील राजकीय महिला इंटर कॉलेजच्या विद्यार्थ्यांबरोबर मोदी यांनी संवाद साधला. अयोध्या धाम जंक्शन स्थानकाचा पुनर्विकास करण्यात आला असून २४१ कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेले अयोध्या धाम जंक्शन स्थानक वातानुकूलित आहे. अयोध्या धाम जंक्शन स्थानक तीन अधिक एक मजली असून स्थानकात लिफ्ट, सरकते जिने, फूड प्लाझा, पूजेच्या साहित्याचे दुकान, क्लास रूम, हिरकणी कक्ष, वेटिंग हॉल अशा सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in