अयोध्येत सेलिब्रिटींची मांदियाळी

अयोध्येत सेलिब्रिटींची मांदियाळी

श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत निमंत्रितांची गर्दी होउ लागली आहे.
Published on

नवी दिल्ली : श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत निमंत्रितांची गर्दी होउ लागली आहे. चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी देखील आता हळूहळू श्रीरामाच्या चरणी धडकू लागले आहेत. कंगना राणावत, शेफाली शहा, पवन कल्याण, रणदीप हुडा यांनी आधीच अयोध्या गाठली आहे. तर सुपरस्टार रजनीकांत आणि प्रख्यात गायक शंकर महादेवन लखनौच्या विमानतळावरुन अयोध्येसाठी रवाना झाले आहेत. एकूण ८ हजार प्रतिष्ठितांना या सोहळ्याचे निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यात पहिल्या ‘ए’ यादीत ५०६ प्रतिष्ठितांचा समावेश आहे. यात प्रामुख्याने महत्वाचे राजकीय नेते, उद्योगपती, मोठे चित्रपट अभिनेते, प्रख्यात क्रिडापटू, राजदूत, न्यायाधीश आणि उच्च पातळीच्या पुजाऱ्यांचा समावेश आहे. अनुपम खेर, मधुर भांडारकर, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, अमजद अली खान, माधुरी दिक्षित, अनुराधा पौडवाल, रामायणाचे स्टार कलाकार अरुण गोविल, सीता दिपीका चिखलिया हे प्रतिष्ठित सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in