जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम लीगवर केंद्राची बंदी

दहशतवादी कारवायांचे समर्थन करत आहेत आणि लोकांना इस्लामिक राज्य स्थापन करण्यास प्रवृत्त करतात. असे शहा यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.
जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम लीगवर केंद्राची बंदी
PM

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या आणि दहशतवादी कारवायांचे समर्थन करणाऱ्या मुस्लिम लीग जम्मू काश्मीर (मसरत आलम गट) (एमएलजेके-एमए) यांना बुधवारी प्रतिबंधित संघटना म्हणून घोषित करण्यात आले आहे.

बेकायदेशीर कृती (प्रतिबंध) कायद्यांतर्गत एमएलजेके-एमएवर बंदी घालण्याची घोषणा करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा संदेश परखड आणि स्पष्ट आहे की राष्ट्राची एकता, सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात कोणीही कृती केल्यास त्यांना सोडले जाणार नाही. त्यांना कायद्याच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.

"मुस्लिम लीग जम्मू-काश्मीर (मसरत आलम गट) ला यूएपीए अंतर्गत 'बेकायदेशीर संघटना' म्हणून घोषित करण्यात आले आहे. ही संघटना आणि तिचे सदस्य जम्मू आणि काश्मीरमध्ये देशविरोधी आणि फुटीरतावादी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. दहशतवादी कारवायांचे समर्थन करत आहेत आणि लोकांना इस्लामिक राज्य स्थापन करण्यास प्रवृत्त करतात. असे शहा यांनी एक्सवर पोस्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in