नोएडात अमूल आइस्क्रीममध्ये गोम

नोएडातील एका ग्राहकाने अमूलचे आइस्क्रीम खरेदी केले असता त्या बॉक्समध्ये गोम सापडल्याने खळबळ उडाली आहे.
नोएडात अमूल आइस्क्रीममध्ये गोम
@Jyoti_karki_/ X

नोएडा : नोएडातील एका ग्राहकाने अमूलचे आइस्क्रीम खरेदी केले असता त्या बॉक्समध्ये गोम सापडल्याने खळबळ उडाली आहे. ज्या आइस्क्रीम बॉक्समध्ये गोम सापडली तो बॉक्स परत करावा, असे कंपनीने ग्राहकाला सांगितले असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

नोएडातील रहिवासी दीपा देवी यांनी १५ जूनला आपल्या मुलांसाठी ‘ब्लिंकिट’वरून ऑनलाईन आइस्क्रीम ऑर्डर केले होते. त्यांनी अमूलचे व्हॅनिला मॅजिक फ्लेवरचे आइस्क्रीम ऑर्डर केले होते. ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांनी ते उघडले तेव्हा त्यांना आत एक गोम दिसली. त्यांनी लगेचच ब्लिंकिटकडे तक्रार केली असता, त्यांना ब्लिंकिटने पैसे परत केले. दरम्यान, ब्लिंकिटने सांगितले की, अमूलचे व्यवस्थापक तुमच्याशी संपर्क साधतील. तर अन्न सुरक्षा अधिकारीही या प्रकरणाचा तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in