

नवी दिल्ली: केंद्र सरकारने शनिवारी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेत त्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) आणि महागाई निवारण भत्त्यात (डीआर) २ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाचा लाभ सुमारे ५०.४६ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८.२७ लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना या निर्णयाची माहिती दिली. या निर्णयामुळे महागाई भत्ता आता सध्याच्या ५८ टक्क्यांवरून वाढून ६० टक्के झाला आहे. ही वाढ १ जानेवारी २०२६ पासून लागू करण्यात येणार आहे. महागाई भत्ता आणि महागाई निवारण या दोन्हीमधील वाढीमुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक ६,७९१.२४ कोटी वळविण्यात आली. शुक्रवारी रात्री १०:२५ वाजता ही घटना घडली. खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ प्रशासनाने सर्व उड्डाणे तत्काळ रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. ही वाढ ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार स्वीकारलेल्या सूत्रानुसार करण्यात आली असून, वाढत्या महागाईपासून दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाढत्या महागाईच्या काळात केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या हातात येणाऱ्या रकमेत वाढ होणार असून, त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.