नायजरमधून तत्काळ बाहेर पडा केंद्र सरकारचे भारतीयांना आवाहन

भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हा संदेश प्रसारित केला आहे
नायजरमधून तत्काळ बाहेर पडा  केंद्र सरकारचे भारतीयांना आवाहन

नवी दिल्ली : आफ्रिकेतील बंडाळीग्रस्त नायजर या देशातून भारतीय नागरिकांनी ताबडतोब बाहेर पडावे, असे आवाहन केंद्र सरकारने शुक्रवारी केले आहे.

नायजरमध्ये २६ जुलै रोजी झालेल्या लष्करी बंडात जनरल अब्दुलरहमान चियानी यांनी लोकनियुक्त अध्यक्ष मोहम्मद बझुम यांची सत्ता उलथून टाकली होती. तेव्हापासून तेथील परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून, विविध देशांचे नागरिक तेथून बाहेर पडत आहेत. सध्या नायजरमध्ये साधारण २५० भारतीय नागरिक आहेत. त्यांनी ताबडतोब नायजरमधून बाहेर पडावे, असा सल्ला केंद्र सरकारने दिला आहे. भारतीय परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी हा संदेश प्रसारित केला आहे. मदतीसाठी नायजरची राजधानी नियामे येथील भारतीय वकिलातीत +२२७ ९९७५ ९९७५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in