कर्मचारी, पेन्शनर्सना केंद्र सरकारचा झटका; कोरोना काळातील ‘डीए’ची थकीत रक्कम देण्यास नकार

केंद्र सरकारने कर्मचारी, पेन्शनर्सना अनपेक्षित झटका दिला आहे. सरकारी कर्मचारी व पेशनर्न्सची कोरोना काळात रोखण्यात आलेली ‘डीए’ची थकीत रक्कम आता मिळणार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली.
कर्मचारी, पेन्शनर्सना केंद्र सरकारचा झटका; कोरोना काळातील ‘डीए’ची थकीत रक्कम देण्यास नकार
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कर्मचारी, पेन्शनर्सना अनपेक्षित झटका दिला आहे. सरकारी कर्मचारी व पेशनर्न्सची कोरोना काळात रोखण्यात आलेली ‘डीए’ची थकीत रक्कम आता मिळणार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत दिली.

कोरोना काळातील रोखलेली थकीत ‘डीए’ची रक्कम सरकार देणार की नाही?, जर मिळणार नसेल तर त्याचे कारण काय आहे? अशा शब्दांत जावेद अली खान व रामजी लाल शर्मा यांनी राज्यसभेत सरकारला धारेवर धरले होते. त्यानंतर या प्रश्नाच्या उत्तरात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की, “कोरोना काळात अर्थव्यवस्थेची घडी बिघडलेली होती. त्यामुळे ‘डीए’ व ‘डीआर’ रोखून धरला होता. सरकारपुढे आर्थिक अडचणी होत्या. या भत्त्यांची थकीत रक्कम सध्या देणे शक्य नाही.”

सरकारने वाचवले ३४,४०२.३२ कोटी रुपये

कोरोना काळात केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे ‘डीए’ रोखून ३४,४०२.३२ कोटी रुपये वाचवले होते. ‘भारत पेन्शनर समाजा’चे सरचिटणीस एस. सी. महेश्वरी यांनीही कोरोना काळात रोखलेला १८ महिन्यांचा ‘डीए’ देण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.

दरम्यान, यापूर्वी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले की, “केंद्र सरकारची वित्तीय तूट नियमापेक्षा दुपटीने अधिक आहे. त्यामुळे ‘डीए’ किंवा ‘डीआर’ची थकीत रक्कम देणे शक्य नाही.”

logo
marathi.freepressjournal.in