नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील प्रदूषण वाढत असल्याने पराळी जाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दंडामध्ये केंद्र सरकारने दुप्पट वाढ केली आहे. ५ एकरांपेक्षा जास्त जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ३० हजार रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल.
सरकारच्या अधिसूचनेनुसार, दोन एकरपेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना २५०० ऐवजी ५ हजार रुपये दंड, २ ते ५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ ऐवजी १० हजार रुपये दंड भरावा लागेल.
वाहनांचे प्रदूषण, पराळी जाळणे, फटाके वाजवणे व स्थानिक प्रदूषणामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवा प्रदूषित झाली आहे. शेतकऱ्यांनी पराळी जाळल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदूषणात वाढ झालेली दिसत आहे, असे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने सांगितले.