केंद्र सरकारने काल संसदेचं विशेष अधिवेश बोलवण्याची घोषणा केली. १८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान हे विशेष अधिवेश बोलावण्यात आलं आहे. याच्या दुसऱ्याचं दिवशी केंद्र सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज (१ सप्टेंबर) भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षेतखाली एका समिनीची स्थापना केली आहे. सरकारने "एक राष्ट्र, एक निवडणूक" ची शक्यता तपासण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे.
"एक राष्ट्र, एक निवडणूक" वर मोदींचा भर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षापासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यावर जोर दिला आहे. आता देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची समिती स्थापन केल्याने सरकारचे याबाबतचं गांभिर्य अधोरेखीत होतं.
येत्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होणार असून पुढच्या वर्षी मे-जूनमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे मोदी सरकार ने हे पाऊल उचलं असल्याचं बोललं जात आहे.