माजी अग्निवीरांसाठी १० टक्के राखीव जागा

केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर माजी अग्निवीरांसाठी ‘सीआयएसएफ’ आणि ‘बीएसएफ’ दलांमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे गुरुवारी दोन्ही दलांच्या प्रमुखांनी सांगितले.
माजी अग्निवीरांसाठी १० टक्के राखीव जागा
Representative image/Reuters
Published on

नवी दिल्ली : केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर माजी अग्निवीरांसाठी ‘सीआयएसएफ’ आणि ‘बीएसएफ’ दलांमध्ये कॉन्स्टेबल पदासाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असल्याचे गुरुवारी दोन्ही दलांच्या प्रमुखांनी सांगितले. ‘सीआयएसएफ’च्या महासंचालक नीना सिंह आणि ‘बीएसएफ’चे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी १० टक्के राखीव जागा ठेवण्याबाबत दिलेल्या माहितीमुळे अग्निपथ भरती योजना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी अग्निवीरांच्या भरतीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘सीआयएसएफ’ने माजी अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे.

वयाची अटही शिथील करणार

‘सीआयएसएफ’मध्ये यापुढे होणाऱ्या कॉन्स्टेबल पदासाठीच्या भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार असून, शारीरिक चाचणीमध्येही त्यांच्यासाठी वयाच्या अटीसह अन्य सवलती दिल्या जाणार आहेत. पहिल्या वर्षासाठी वयाची अट पाच वर्षे शिथील करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तीन वर्षे शिथील केली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in