MSP Hike : रब्बी पिकांच्या ‘एमएसपी’त वाढ; शेतकऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत विपणन हंगाम २०२७-२८ साठी सर्व अधिसूचित रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली.
MSP Hike : रब्बी पिकांच्या ‘एमएसपी’त वाढ; शेतकऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णय
MSP Hike : रब्बी पिकांच्या ‘एमएसपी’त वाढ; शेतकऱ्यांसाठी केंद्राचा मोठा निर्णयप्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेत विपणन हंगाम २०२७-२८ साठी सर्व अधिसूचित रब्बी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली.

अधिकृत निवेदनानुसार, रब्बी पिकांच्या एमएसपीमध्ये करडईसाठी प्रति क्विंटल ६७५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर मोहरीसाठी प्रति क्विंटल ४१३ रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. त्याचप्रमाणे मसूर प्रति क्विंटल ३९० रुपयांची वाढ, सातू (बार्ली): प्रति क्विंटल १३६ रुपयांची वाढ, हरभरा: प्रति क्विंटल ८३ रुपयांची वाढ, गहू: प्रति क्विंटल २५ रुपयांची वाढ जाहीर झाली आहे.

उत्पादकांना त्यांच्या पिकाचा योग्य व किफायतशीर मोबदला मिळवून देण्यासाठी सरकारने विपणन हंगाम २०२७-२८ साठी रब्बी पिकांच्या एमएसपीत ही वाढ केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०१८-१९ मधील घोषणांनुसार, एमएसपी हा अखिल भारतीय भारित सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान १.५ पट निश्चित करण्याच्या धोरणाशी ही वाढ सुसंगत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अलिकडच्या वर्षांत सरकारने तृणधान्यांव्यतिरिक्त डाळी आणि गळित धान्य पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना उच्च एमएसपी देऊ केला आहे.

खरेदी आणि वाटपात मोठी वाढ

२०१४-१५ ते २०२५-२६ या कालावधीत गव्हाची खरेदी वाढून ३७१५ लाख मेट्रिक टन (LMT) झाली आहे, जी २००४-०५ ते २०१३-१४ या काळात २२५४ लाख मेट्रिक टन होती, या काळात ६ रब्बी पिकांची खरेदी वाढून ३,९२१ लाख मेट्रिक टन झाली आहे, जी आधीच्या दशकात २३०२ लाख मेट्रिक टन होती. २०१४-१५ ते २०२५-२६ दरम्यान गहू उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपीपोटी ७.३१ लाख कोटी रुपयांचे वाटप झाले आहे, जे २००४-०५ ते २०१३-१४ या काळात २.५६ लाख कोटी रुपये होते, ६ रब्बी पिके उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेली एमएसपी रक्कम वाढून ८.३६ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे, जी आधीच्या काळात २.६५ लाख कोटी रुपये होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in