वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पुन्हा पत्र

साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पुन्हा पत्र

देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पुन्हा एकदा सर्व राज्यांना उद्देशून पत्र लिहिले आहे. यात त्यांनी वाढत्या कोरोना रुग्णसंख्येत गाफील राहू नये, सावध राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. गेल्या दोन आठवड्यांत देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी गाफील राहू नये आणि परिस्थिती सहजतेने घेऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यांना सर्वतोपरी प्रयत्न करावे लागतील, जसे आपण आत्तापर्यंत करत आलो आहोत, असे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in