सीईओ महिलेने केली आपल्याच मुलाची हत्या; गोवा पोलिसांकडून कर्नाटकात अटक

पोलिसांनी आरोपीला बोलावून तिच्याकडे रक्ताचे डाग आणि तिच्या बेपत्ता मुलाबद्दल चौकशी केली.
सीईओ महिलेने केली आपल्याच मुलाची हत्या; गोवा पोलिसांकडून कर्नाटकात अटक
Published on

पणजी : एका स्टार्टअप कंपनीची मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या सूचना सेठ (३९) हिने गोव्यात तिच्या चार वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येनंतर मुलाचा मृतदेह एका पिशवीत भरून टॅक्सीतून शेजारच्या कर्नाटकात प्रवास केला. या संबंधात गोवा पोलिसांनी आरोपी सूचना सेठ हिला सोमवारी रात्री कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक केली. पतीशी असलेल्या वादातून तिने मुलाची हत्या केल्याचा पोलिसांचा कयास आहे.

सूचना सेठ हिने ६ जानेवारी रोजी आपल्या मुलासह उत्तर गोव्यातील कांदोळी येथे एका अपार्टमेंटमध्ये भाड्याने जागा घेतली. दोन दिवस तेथे राहिल्यानंतर ती सोमवारी टॅक्सीने बंगळुरूला गेली. अपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी नंतर पोलिसांना कळवले की, ती जागा सोडताना तिचा मुलगा तिच्यासोबत दिसत नव्हता. सेठच्या लिंक्डइन पेजनुसार, ती स्टार्टअप माइंडफुल एआय लॅबची मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहे. आणि २०२१ मध्ये एआय नीतिशास्त्रातील १०० ब्रिलियंट महिलांमध्ये होती.

ती राहिलेल्या या अपार्टमेंटमधील जागा सोडताना तिने तेथील कर्मचाऱ्यांना काही कामासाठी बंगळुरू येथे जायचे असल्याचे व टॅक्सीची व्यवस्था करावी, असे सांगितले. त्यावर कर्मचाऱ्यांनी विमान प्रवास लवकर व स्वस्त असेल, असे सांगितले तेव्हा तिने टॅक्सीनेच जाण्याचा आग्रह धरला होता. त्यानुसार ८ जानेवारीला सकाळी तिने फ्लॅटमधून बाहेर पडली. नंतर अपार्टमेंटचे कर्मचारी ती ज्या खोलीत राहिली त्या खोलीची साफसफाई करण्यासाठी गेले असता त्यांना टॉवेलवर रक्ताचे डाग आढळले, असे कलंगुट पोलीस ठाण्याचे निरीक्षक परेश नाईक यांनी यांनी सांगितले.

त्यानंतर पोलिसांनी आरोपीला बोलावून तिच्याकडे रक्ताचे डाग आणि तिच्या बेपत्ता मुलाबद्दल चौकशी केली. आरोपींनी रक्ताचे डाग तिच्या मासिक पाळीमुळे असल्याचे आणि तिचा मुलगा मडगाव शहरात तिच्या मैत्रिणीकडे होता आणि त्याने पत्ता दिला, मात्र तो पत्ता खोटा असल्याचे आढळून आले. इन्स्पेक्टर नंतर फोनवर टॅक्सी ड्रायव्हरशी बोलले, जो बंगळुरूला जात होता आणि आरोपीला जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यासाठी कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात पोहोचला होता.

त्यानंतर कलंगुट पोलिसांचे पथक चित्रदुर्ग येथे रवाना झाले आणि गोव्यात आणलेल्या आरोपीचा ट्रान्झिट रिमांड घेतला. मृतदेहाचे शवविच्छेदन चित्रदुर्ग येथे करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. आरोपीची अद्याप चौकशी झाली नसली तरी, तिने तपासकर्त्यांना सांगितले की ती आणि तिचा पती वेगळे आहेत आणि त्यांच्या घटस्फोटाची कार्यवाही सध्या सुरू आहे.

आरोपी महिला ही मूळची पश्चिम बंगालची असून ती बंगळुरूमध्ये राहते, तर तिचा नवरा केरळचा आहे. तो सध्या जाकार्ता (इंडोनेशिया) येथे असून त्याला या घटनेची माहिती देण्यात आली आहे, आरोपी महिलेने मुलाचा मृतदेह तिच्या सामानामध्ये भरला होता. मुलाच्या हत्येमागील हेतू तिच्या चौकशीनंतरच समजेल, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in