दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा मणिपूरला ; मोदी आणि स्मृती इराणी यांना करणार विनंती

मी येथे लोकांना मदत करायला आली आहे. कृपया मला त्याची परवानगी द्या. असं स्वाती मालिवाल म्हणाल्या
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा मणिपूरला ; मोदी आणि स्मृती इराणी यांना करणार विनंती

मणिपूरयेथील हिंसाचार हा संपूर्ण देशासाठी चिंतेचा विषय झाला आहे. येथील एका व्हायरल व्हिडिओने संपूर्ण देशात संतापाची लाट उसळळी. याच पार्श्वभूमीवर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल या मणिपूरमध्ये पोहोचल्या आहेत.

यावेळी बोलताना स्वागी मालिवाल म्हणाल्या की, "मी इथे राजकारण करायला नाही आलो. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना मणिपूर येण्याची विनंती करणार आहे. इथल्या राज्यापालांना देखील भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे."

तसंच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "मी थेट मुख्यमंत्री कार्यालयात जाईन, मला मुख्यमंत्री बिरेन सिंह यांना भेटायचं आहे. लैगिंक पीडितांना देखील मला भेटायचं आहे. कायदेशीर मदत, समुपदेश किंवा कोणतीही भरपाई त्यांना मिळाले आहे की नाही ते पाहायचं आहे." असं स्वाती मालिवाल म्हणाल्या आहेत.

तसंच त्यांनी मणिपूर सरकारला आवाहन केलं आहे. मी येथे लोकांना मदत करायला आली आहे. कृपया मला त्याची परवानगी द्या. असं स्वाती मालिवाल म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in