देशातील श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू; ९३१ कोटींची संपत्ती

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे पुन्हा एकदा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या वार्षिक यादीत अव्वल ठरले आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

नवी दिल्लीः आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू हे पुन्हा एकदा असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांच्या वार्षिक यादीत अव्वल ठरले आहेत. त्यांच्या जाहीर केलेल्या ९३१ कोटी रुपयांच्या संपत्तीपैकी बहुतांश हिस्सा हा त्यांच्या कुटुंबाकडे असलेल्या 'हेरिटेज फूड्स' या डेअरी रिटेल कंपनीमधून आहे, जी त्यांनी कोणत्याही सरकारी मदतीशिवाय ३३ वर्षांपूर्वी सुरू केली होती.

देशातील ३० मुख्यमंत्र्यांची एकत्रित संपत्ती १६३२ कोटी आहे. त्यातील ५७ टक्के वाटा एकट्या चंद्राबाबू नायडू यांच्याकडे आहे. नायडू यांच्याकडे ८१० कोटींची चल संपत्ती आहे. तर १२१ कोटींची अचल संपत्ती आहे. तर १० कोटींचे कर्ज आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांची ३३२.५ कोटी रुपये, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ५१.९३ कोटी, नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ ४६.९५ कोटी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव ४२.०४ कोटी रुपये संपत्ती आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. त्यांच्याकडे १५.३८ लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे कोणती अचल संपत्ती नाही.

नायडू यांच्या नावावर 'हेरिटेज फूड्स लि.' मधील कोणताही हिस्सा नाही, मात्र त्यांची पत्नी भुवनेश्वरी नारा यांच्या नावावर २४.३७ टक्के हिस्सा आहे. त्यामुळे हा मालमत्ता हिस्सा नायडू यांच्या संपत्तीत धरला जातो. नारा कुटुंबाकडे (प्रवर्तक) मिळून एकूण ४१.३ टक्के हिस्सा आहे. कंपनीचे भांडवली मूल्य १९९५ मध्ये २५ कोटींवरून वाढून शुक्रवारी (बीएसईवर) ४,३८१ कोटींवर पोहोचला. जून २०२४ मध्ये तो उच्चांक ६,७५५ कोटींवर गेला होता. कंपनीचे अधिकारी म्हणाले की, हेरिटेज फूड्स ही केवळ दुग्धजन्य उत्पादनांची रिटेल कंपनी आहे. ती कोणत्याही 'क्रोनी कॅपिटलिस्ट' क्षेत्राशी संबंधित नाही. कंपनीची प्रगती ही केवळ ग्राहकांनी उत्पादनांना दिलेल्या प्रतिसादावर उभी आहे. ही कंपनी नायडू केवळ आमदार असताना स्थापन झाली होती.

मुख्यमंत्रीपदावर ते त्यानंतर बराच उशिरा आले. १९९२ मध्ये चित्तूर जिल्ह्यात दूधाचे उत्पादन मुबलक होते आणि शेतकऱ्यांना विक्रीत अडचणी येत होत्या. त्यातूनच नायडूंनी १९९२ मध्ये हेरिटेज फूड्सची स्थापना केली. अधिकृत भांडवल १ कोटी रुपये आणि भरलेले भांडवल फक्त ७ हजार रुपये इतके होते. १९९३ मध्ये कंपनीने कामकाज सुरू केले व पुढच्या वर्षी आयपीओ आणला. हा आयपीओ ५४ पट ओव्हरसबस्क्राइब झाला आणि नेटवर्थ १९९४ मध्ये ९.९९ बीएसई व एनएसईवर सूचीबद्ध झाला. पहिल्याच वर्षी कंपनीने चित्तूर येथे दूध शीतकरण यंत्रणा उभारली, १९ हजार लिटर दूध प्रक्रिया केले आणि ४.३६ कोटी रुपयांचा उलाढाल करत १९ लाखांचा नफा कमावला. त्यानंतर कंपनीने २००० मध्ये १०० कोटी, २००८ मध्ये ५०० कोटी, २०११ मध्ये १००० कोटी, २०१६ मध्ये २००० कोटी, २०२३ मध्ये ३००० कोटी, तर २०२५ मध्ये ४००० कोटींचा टप्पा गाठला. कंपनीची कोटींवरून २०२५ मध्ये ९७२ कोटींवर पोहोचली.

logo
marathi.freepressjournal.in