
भारताच्या चांद्रयान - ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केल्याने इतिहास घडवला आहे. यानिमित्ताने भारत हा चंद्रवार सॉफ्ट लँडिंग करणारा चौथा तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला आहे. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोत्रच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला असून त्यांना या कामगिरीबद्दल शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं आहे. अखंड भारतासाठी हा महत्वाचा क्षण असल्याचं सांगत हा क्षण भारताला नवी चेतना देणारा असल्याचं मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले
आपण जेव्हा आपल्या डोळ्यांनी इतिहास घडताना पाहतो. तेव्हा जीवन धन्य झाल्याचं दिसतं. हा चिरंजीवी, अविस्मरणीय, अद्भूत क्षण आहे. विकसीत भारताच्या शंखनादाचा हा क्षण आहे. नव्या भारताच्या जयघोषाचा हा क्षण आहे. अवघड महासागराला पार करण्याच हा क्षण आहे. जिंकण्याच्या नव्या वाटेचा हा क्षण आहे. १४० कोटीं लोकांच्या आशेचा हा क्षण आहे. नव्या चेतना आणि उर्जेचा हा क्षण आहे. हा क्षण नव्या भारताचा आहे.
ते म्हणाले की, मी ब्रिक्समध्ये आहे. पण ताता प्रत्येक भारतीयासारखं माझही मन चांद्रयान-३ मध्ये गुंतलं आहे. मी आनंदी असून देशवासीयांसोबत आनंद साजरा करण्यासाठी उत्सूक आहे. मी इस्रो, देशातल्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देतो. ज्यांनी गेल्या वर्षापासून मेहनत घेतली. त्यांचे आभार मानतो. देशातल्या १४० कोटी जनतेला धन्यवाद देतो, असं मोदी म्हणाले.