Chandrayaan-3 : विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं ; इस्त्रोने ट्विट करत दिली माहिती

या मोहिमेने सर्व टप्पे नियोजित वेळेत पार केल्यास चंद्रायान-३ हे २३ ऑगस्टला संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल अशी माहिती इस्त्रोने दिली आहे.
Chandrayaan-3 : विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं ; इस्त्रोने ट्विट करत दिली माहिती

सर्व भारतीयांसाठी अभिमाची बातमी समोर आली आहे. भारताच्या महत्वकांक्षी चांद्रयान ३ मोहिमेतील आणखी एक टप्पा यशस्वीरित्या पार पडला आहे. भारतीय अंतराळ संस्थेच्या(ISRO) चांद्रयान-3 चं (Chandrayaan-3) विक्रम लँडर प्रोप्यलुशन मॉडेलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे. आता इस्त्रोने ट्विट करत चांद्रयान -३ संदर्भात सर्वात मोठी अपडेट दिली आहे. इस्त्रोन आपल्या ट्विटमध्ये सांगितलं की, चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूलपासून यशस्वीरित्या वेगळं झालं आहे. महत्वाचं म्हणजे चांद्रयान-३ चा आतापर्यंतचा प्रवास नियोजित वेळेत पूर्ण झाला आहे. त्यामुळे यान चंद्रावर उतरायला आता अवघे काही दिवसचं शिल्लक राहीले आहेत.

इस्रोने सांगितलं होतं की, १७ ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळा होईल. आता इस्त्रोन ट्विट करत लिहलं की, "लँटर मॉड्यूल म्हणाले की, 'प्रवासासाठी धन्यवाद मित्रा!' लँडर मॉड्यूल प्रोपल्शन मॉड्यूल पासून यशस्वीरित्या वेगळं करण्यात आलं आहे. उद्या नियोजित डीबूस्टिंग होईल, त्यानंतर लँडर मॉड्यूल चंद्राच्या जवळच्या कक्षेत लँडिंसाठी सेट करण्यात येईल."

14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून चांद्रयान-३ यशस्वीरित्या प्रक्षेपण पार पडलं. १ ऑगस्ट रोजी चांद्रयानने पृथ्वीच्या कक्षेतून जाण्यासाठी प्रवास सुरु केला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. या मोहिमेने सर्व टप्पे नियोजित वेळेत पार केल्यास चंद्रायान-३ हे २३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.४७ वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी माहिती इस्त्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली होती.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in