प्रदूषणामुळे दिल्लीतील सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल

दिल्लीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडू लागला आहे. आता प्रदूषणामुळे सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. प्रदूषणामुळे सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
प्रदूषणामुळे दिल्लीतील सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल
Published on

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीकरांचा श्वास कोंडू लागला आहे. आता प्रदूषणामुळे सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. प्रदूषणामुळे सरकारी कार्यालयाच्या वेळेत बदल होण्याची ही पहिलीच घटना आहे.

दिल्ली मनपा, दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या कार्यालयात वेगवेगळ्या कामाच्या वेळा असतील. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी सांगितले की, रस्त्यावरील वाहतूककोंडी व प्रदूषण कमी करण्यासाठी दिल्लीतील सरकारी कार्यालये वेगवेगळ्या वेळी उघडतील.

दिल्ली मनपाची कार्यालये सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत, केंद्र सरकारची कार्यालये ९ ते सायं. ५.३०, तर दिल्ली सरकारची कार्यालये सकाळी १० ते ६.३० दरम्यान सुरू असतील.

दिल्लीतील वाढते प्रदूषण लक्षात घेता शहरातील प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळा ऑनलाईन चालवल्या जाणार आहेत. तसेच कमीत कमी अंतरासाठी सायकलचा वापर करा, सार्वजनिक वाहनांचा वापर करा, वर्क फ्रॉम होम आदी सूचना सरकारने केल्या आहेत. तसेच सहावीच्या वर्गावरील मुलांना चेहऱ्यावर मास्क सक्तीचा केला आहे. तसेच विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढणे बंद केले असून त्यांना वाचन, चित्रकला, हस्तकला, बुद्धिबळ व कॅरम आदी उपक्रमासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

logo
marathi.freepressjournal.in