छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने तोडले तारे; वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात संताप

‘छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते,’ असा दावा गुजरातमधील भाजपचे बडे नेते सी. आर. पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून त्यावरून तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने तोडले तारे; वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात संताप
छत्रपती शिवाजी महाराज पाटीदार होते! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांने तोडले तारे; वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात संताप
Published on

सूरत : राज्यात महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्योरापांचा धुरळा उडाला असतानाच, भाजपचे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत खळबळजनक विधान केले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते,’ असा दावा गुजरातमधील भाजपचे बडे नेते सी. आर. पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून त्यावरून तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत.

सुरतमध्ये पाटीदार समाजाकडून आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भाजपचे मंत्री सी. आर. पाटील म्हणाले की, ‘सरदार वल्लभभाई पटेल यांना संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे श्रेय द्यायला हवे. सरदार पटेल हे पाटीदार समाजाचे होते. समाजात कुणीही उपाशी राहू नये, याची काळजी पाटीदार समाजाकडून घेतली जाते. त्यालाच पाटीदार म्हणतात. मला हे सांगायला आनंद होतोय की, छत्रपती शिवाजी महाराज हेदेखील पाटीदार होते. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा यशस्वी प्रयत्न केला’.

छत्रपतींना गुजराती करण्याचा प्रयत्न - संजय राऊत

‘छत्रपती शिवाजी महाराजांना गुजराती करण्याचा प्रयत्न चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे, मराठा साम्राज्याचे राजे आहेत. त्यांनी सूरत लुटली, याचा तुम्ही अशाप्रकारे सूड घेऊ नका. हा महाराष्ट्राचा, मराठी समाजाचा मोठा अपमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे. भाजपने नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, रवींद्रनाथ टागोर असे अनेक युगपु्रुष पळवायचा प्रयत्न केला. पण उपयोग झाला नाही. शेवटी आता ते छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातला पळवायचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

अजित पवारांची अप्रत्यक्ष नाराजी

पाटील यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका होत असून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत अजित पवार म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची वंशावळ सगळ्यांना माहिती आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बोलत असतो. पाटील यांचे भाषण मी काही ऐकलेले नाही. पण महाराजांचा वंश, भोसले घराणे, सातारची गादी हे सगळ्यांना माहिती आहे’.

logo
marathi.freepressjournal.in