भारत-पाक सिमेवर छत्रपतींच्या आश्वारुढ पुतळ्याचं दिमाखात अनावरण ; मुख्यमंत्र्यासह सांस्कृतीक मंत्र्यांची उपस्थिती

हा पुतळा सैनिकांना प्रेरित करेल, त्यांना उर्जा देईल. त्यामुळे शत्रूची आपल्याकडे बघायची हिंमत होणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भारत-पाक सिमेवर छत्रपतींच्या आश्वारुढ पुतळ्याचं दिमाखात अनावरण ; मुख्यमंत्र्यासह सांस्कृतीक मंत्र्यांची उपस्थिती

काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण झाले. लेझीम आणि झांज वादनाने अवघ कुपवाडा आज दुमदुमून गेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष पर्वतरांगांच्या पलिकडे असलेल्या पाकिस्तानात पोहचला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामुळे प्रेरणा दिली आहे. शत्रूच्या छातीत देशाचा तिरंगा गाडण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा सैनिकांना प्रेरित करेल, त्यांना उर्जा देईल. त्यामुळे शत्रूची आपल्याकडे बघायची हिंमत होणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अशा आश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. शिवरायांच्या पुतळ्याचं आज अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी बोलाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपतींचा हा पुतळा प्रेरणादायी आहे. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य मिळालं. विश्वास बसत नाही. भारत पाक सिमेवर छत्रपतींचा अश्वारुढ पुतळा बसवण्यात आला आहे.

ज्या लाल चौकात सामान्य माणसांना जाणं कठीण होतं. तिथे पंतप्रधानांनी तिरंगा फडकवला आहे. महाराष्ट्र आणि काश्मीरचे नातं जुनं होतं. महाराष्ट्रातील अनेक संस्था काश्मीरमध्ये काम करत आहे. त्यांचं योगदान अतिशय मोठं असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी बोलताना राज्याचे सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज या नावातच उर्जा आहे. त्यांच्या पुतळा हा प्रेरणादायी असून वाईट नजरेने देशाकडे पाहणाऱ्यांसाठी इशारा आहे. महाराष्ट्राच्या सरकारची कधीही मदत लागली तर आम्ही जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करत सदैव तुमच्यासोबत राहु. ४१ आर आर ही बटालियन नेहमीच तयार असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in