

विजापूर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात बुधवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला, तर जिल्हा राखीव दलाचे तीन जवान शहीद झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विजापूर-दंतेवाडा सींमेवर अद्यापही चकमक सुरू आहे. चकमकीत अन्य दोन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान ही चकमक उडाली. घटनास्थळावरून आतापर्यंत १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मात्र त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनास्थळवावरून एसएलआर, इन्सास रायफल आणि अन्य शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.
या चकमकीत हेडन्स्टेबल मोनू वदादी, कॉन्स्टेबल दुकारू गोंदे आणि जवान रमेश सोधी हे शहीद झाले असून अन्य दोन जवान जखमी झाले आहेत.