छत्तीसगड स्फोटात ३ जवान शहीद; सुरुंग शोधताना आयईडीचा स्फोट, एक जवान गंभीर जखमी

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात शनिवारी एका डिमाइनिंग (सुरुंग शोध आणि निकामी करणे) मोहिमेदरम्यान झालेल्या आयईडी स्फोटात जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) तीन जवान शहीद झाले असून, एक जवान गंभीर जखमी झाला आहे.
छत्तीसगड स्फोटात ३ जवान शहीद; सुरुंग शोधताना आयईडीचा स्फोट, एक जवान गंभीर जखमी
छत्तीसगड स्फोटात ३ जवान शहीद; सुरुंग शोधताना आयईडीचा स्फोट, एक जवान गंभीर जखमीप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

कांकेर : छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात शनिवारी एका डिमाइनिंग (सुरुंग शोध आणि निकामी करणे) मोहिमेदरम्यान झालेल्या आयईडी स्फोटात जिल्हा राखीव दलाचे (डीआरजी) तीन जवान शहीद झाले असून, एक जवान गंभीर जखमी झाला आहे.

देशातून सशस्त्र माओवाद्यांचा बिमोड झाल्याची अधिकृत घोषणा ३१ मार्च रोजी करण्यात आल्यानंतर, राज्यातील नक्षलवादी कारवायांशी संबंधित ही पहिलीच स्फोट घटना आहे. छोटेबेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात, नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर ही घटना घडली.

डीआरजीचे पथक परिसरात आयईडी शोधून काढण्याची आणि निकामी करण्याची मोहीम राबवत होते. यादरम्यान सुरक्षा दलांना एक आयईडी आढळला. तो निकामी करत असतानाच अचानक स्फोट झाला, ज्यामध्ये चार जवान गंभीर जखमी झाले. त्यापैकी तीन जवान जागीच शहीद झाले.

पोलिसांचे निवेदन

बस्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पटीलिंगम यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत शरण आलेल्या माओवाद्यांकडून मिळालेली माहिती आणि इतर गुप्तचर माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी बस्तर पट्टयात नक्षलवाद्यांनी पेरलेले शेकडो आयईडी जप्त करून निकामी केले आहेत. मात्र, आजच्या या घटनेत कांकेर जिल्हा पोलीस पथक आयईडी निकामी करत असताना दुर्दैवी अपघात घडला.

logo
marathi.freepressjournal.in