छत्तीसगडमधील चकमकीत दोन महिलांसह ३ नक्षलवादी ठार

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत दोन महिलांसह तीन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर एकूण १५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

सुकमा : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत दोन महिलांसह तीन नक्षलवादी ठार झाले. त्यांच्यावर एकूण १५ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

जिल्हा राखीव दलाच्या तुकडीने नक्षलवादविरोधी मोहीम हाती घेतली होती, तेव्हा तुमलपाड गावातील डोंगराळ प्रदेशात ही चकमक उडाली. दीर्घकाळ चाललेल्या या चकमकीनंतर सुरक्षा दलांना घटनास्थळी तीन मृतदेह आढळले. त्यामध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

घटनास्थळावरून सुरक्षा दलांनी ए.३०३ रायफल, बॅरल ग्रेनेड लॉन्चर्स अन्य शस्त्र आणि स्फोटके जप्त केली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटली असून त्यांची नावे मडवी देवा, पोडियम गंगी आणि सोधी गंगी अशी आहेत. त्यांच्यावर प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

बस्तर परिमंडळात यंदा आतापर्यंत २३३ नक्षलवादी ठार झाले आहेत. केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in