तेलंगणात ४० लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा

तेलंगणामधील काँग्रेस सरकारने ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
तेलंगणात ४० लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची घोषणा

हैदराबाद : तेलंगणामधील काँग्रेस सरकारने ४० लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेवंथा रेड्डी यांनी ३१ हजार कोटींच्या शेती कर्जमाफीला मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याची घोषणा काँग्रेसने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिली होती.

तेलंगणा मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. यात ३१ हजार कोटी रुपयांच्या कृषी कर्ज माफीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज सरकार माफ करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी दिले आहे.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्यानुसार तेलंगणामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे. या कर्ममाफीने ४० लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. छत्तीसगड, राजस्थानमध्येही काँग्रेस सरकार असताना अशाच पद्धतीने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले होते, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. "तेलंगणातील शेतकऱ्यांचे अभिनंदन. तुमचे २ लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून 'किसान न्याय'ची प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या दिशेने काँग्रेस सरकारने एक पाऊल उचलले आहे. ज्यामुळे ४० लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबे कर्जमुक्त होतील. जे बोललो ते करून दाखवले, काँग्रेसचे सरकार जिथे असेल तिथे ते भारताचा पैसा ‘भांडवलदारांवर’ खर्च करणार नाही, ‘भारतीयांवर’ खर्च करेल," असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in