मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांना सोडायला तयार नाही-गुलाबराव पाटील

गुवाहाटीवरून निघण्याआधी बंडखोरांची बैठक झाली. त्या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पवारांना सोडायला तयार नाही-गुलाबराव पाटील

आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेकदा सांगितले, मात्र त्यांनी आपले ऐकले नाही. त्यांनी आपल्याला सोडले, ‘वर्षा’ सोडले; परंतु ते शरद पवार यांना सोडण्यास काही तयार नाहीत, अशी खोचक टीका बंडखोर आमदार आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केली आहे.

गुवाहाटीवरून निघण्याआधी बंडखोरांची बैठक झाली. त्या बैठकीत गुलाबराव पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. गुलाबराव पाटील म्हणाले, “आपल्या सोबतचे आणि अपक्ष आमदार सभागृहात डिबेट करण्यासाठी त्यांना पुरेसे आहेत. हे होण्यापूर्वी ठाकरे यांना आपण याबाबत सर्व सांगितले होते. आम्हाला उद्धव ठाकरेंमुळे मंत्रिपद मिळाले, हे मान्य आहे. मात्र, यासाठी आम्हीही शिवसेनेसाठी कार्य केले आहे. कठीण परिस्थितीत आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य केले आहे. त्यामुळे मंत्रिपद मिळण्यात आमच्याही कामाचा सहभाग निश्‍चितच आहे. आम्ही काही केवळ आयत्या बिळावर नागोबा झालेलो नाही. त्यामुळे आगामी काळासाठी आम्हा सर्वांना एकत्र राहूनच लढाई लढायची आहे.”

दरम्यान, गुलाबरावांना पुन्हा पानटपरीवर जावे लागेल, या शिवसेना नेते संजय राऊतांनी केलेल्या टीकेला पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, “राऊत मला पुन्हा पानटपरीवर चुना लावत बसेल, असे म्हणतात.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in