उद्या तीन राज्यांतील मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता; कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष

भाजपने तिन्ही राज्यांसाठी निरीक्षक नेमले आहेत, ते आज संध्याकाळपर्यंत संबंधित राज्यांमध्ये पोहचणार आहेत.
उद्या तीन राज्यांतील मुख्यमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता; कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री निवडण्याच्या दिशेने भाजपने चांगलीच पावले टाकली आहेत. भाजपने तिन्ही राज्यांसाठी निरीक्षक नेमले आहेत, ते आज संध्याकाळपर्यंत संबंधित राज्यांमध्ये पोहचणार आहेत. राजस्थानसाठी भाजपने राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना निरीक्षक बनवले आहे. याशिवाय हरियाणाचे सीएम मनोहर लाल खट्टर, मध्य प्रदेशातील के. लक्ष्मण व आशा लाखेड यांना निरीक्षक म्हणून पाठविण्यात येणार आहे. अर्जुन मुंडा आणि सर्बानंद सोनोवाल या दोघांना छत्तीसगडला निरीक्षक म्हणून पाठवले आहे.

या निरीक्षकांच्या उपस्थितीत शनिवारी विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडणार असल्याचं बोलले जात आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा होऊ शकते. या बैठकीत निरीक्षक आमदारांचे मत काय आहे, याची माहिती घेतली आहे. या बैठकीनंतर केंद्रीय नेतृत्वाकडून सल्ला घेतला जातो आणि त्यानंतर केंव्हापण मुख्यमंत्रिपदाची घोषणा होऊ शकते. मागील अनेक वर्षांपासून भाजपने उत्तर प्रदेश, आसाम, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री चेहरा जाहीर न करता निवडणूक लढवली आहेत. त्यानंतर निकाल जाहीर झाल्यानंतर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळीही देखील ही परंपरा पुढे चालवली जात आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक खासदार आणि मंत्र्यांना उमेदवारी दिली होती. त्यापैकी एकूण बारा खासदार आणि मंत्री विजयी झाले असून, त्यांनी राजीनामे दिले आहेत. खासदार महंत बालकनाथ, केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर, राकेश सिंह, उदय प्रताप सिंह, रीती पाठक, प्रल्हाद पटेल यांच्याबरोबर १२ खासदारांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता यापैकी कोणालाही मुख्यमंत्री केले जाऊ शकते, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.

राजस्थानमध्ये वसुंधरा राजे, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि छत्तीसगडमध्ये रमण सिंह हे पक्षाचे मोठे नेते राहिले आहेत. अशा स्थितीत त्यांच्या जागी दुसरा कोणी नेता निवडण्याचा निर्णय फारसा सोपा नाही.असे मानले जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व राज्यांमध्ये नवीन पिढीचे नेतृत्व तयार करायचे आहे. त्यामुळे फेरबदलाचाही विचार होऊ शकतो. मात्र, आजतागायत यावर कोणीही काहीही बोललेले नाही. याशिवाय कोणत्याही नेत्याने उघडपणे मुख्यमंत्रीपदाचा दावा मांडलेला नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in