लष्करप्रमुख जवानांच्या भेटीसाठी पूंछमध्ये !

अफवा रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पूंछ आणि राजौरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोमवारी तिसऱ्या दिवशीही मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली.
लष्करप्रमुख जवानांच्या भेटीसाठी पूंछमध्ये !
PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चार जवान शहीद झाल्यानंतर लष्कराने अतिरेक्यांच्या शोधासाठी व्यापक मोहीम उघडली आहे. याच मोहिमेदरम्यान लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सोमवारी घटनास्थळी भेट दिली. लष्करी कमांडर्सची बैठक घेत त्यांनी अतिशय योजनाबद्धरित्या  ऑपरेशन्स करण्याबाबतचे निर्देश दिले.

गुरुवारी दहशतवाद्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट पोलीस स्टेशन हद्दीतील ढेरा की गली आणि बाफलियाज दरम्यानच्या एका वळणावर लष्कराच्या वाहनांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये चार जवानांना प्राण गमवावे लागले होते. यानंतर भारतीय लष्कर आक्रमक झाले असून अतिरेक्यांचा बीमोड करण्यासाठी मोठी मोहीम उघडली आहे. जंगलांमधून अतिरेक्यांचा शोध घेण्यात येत आहे. भारताचे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी पूंछ सेक्टरला सोमवारी  भेट देत सुरक्षा परिस्थितीबद्दल माहिती घेतली. लष्करप्रमुखांनी घटनास्थळी कमांडर्सशी संवाद साधला. त्यांना ऑपरेशन्सबद्दल मार्गदर्शन केले. अफवा रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पूंछ आणि राजौरी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोमवारी तिसऱ्या दिवशीही मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली.

logo
marathi.freepressjournal.in