चीनचे हेरगिरी करणारे अत्याधुनिक जहाज श्रीलंकेत दाखल

आंतरखंडीय क्षेपणास्त्र व उपग्रहांचा शोध घेण्यात ‘युआन वांग-५’ मंगळवारी सकाळी ८ वाजता हंबनटोटा येथे दाखल झाले
चीनचे हेरगिरी करणारे अत्याधुनिक जहाज श्रीलंकेत दाखल

चीनचे हेरगिरी करणारे अत्याधुनिक जहाज ‘युआन वांग-५’ मंगळवारी श्रीलंकेत दाखल झाले. १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान या जहाजाचा श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर मुक्काम असणार आहे. या जहाजाला श्रीलंकेने परवानगी दिल्याबद्दल भारत व अमेरिकेने आक्षेप घेतला होता.

आंतरखंडीय क्षेपणास्त्र व उपग्रहांचा शोध घेण्यात ‘युआन वांग-५’ मंगळवारी सकाळी ८ वाजता हंबनटोटा येथे दाखल झाले. २२ ऑगस्टपर्यंत हे जहाज तेथेच राहील. दरम्यान, आमच्या अत्याधुनिक जहाजामुळे अन्य देशांच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही, असे स्पष्टीकरण चीनने दिले आहे.

चीनच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सांगितले की, ‘युआन वांग-५’ हे जहाज श्रीलंकेच्या सहयोगामुळे हंबनटोटा बंदरात पोहोचले आहे. या बोटीवर असलेली उपकरणे लक्षात घेता भारत व अमेरिकेने त्याला आक्षेप घेतला आहे. ‘युआन वांग-५’ सागरी विज्ञान संशोधन कायदा व आंतरराष्ट्रीय सामान्य प्रक्रियेच्या अनुरूप आहे. श्रीलंकेच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही त्यांना सक्रिय मदत करत आहोत. भविष्यातही करत राहणार आहोत.

चीनच्या मीडियातील माहितीनुसार, या जहाजावर दोन हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. उपग्रह व बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचा ठावठिकाणा शोधण्याची याची क्षमता आहे. दरम्यान, श्रीलंकेने सांगितले की, व्यापक विचारानंतरच आम्ही चिनी जहाजाला परवानगी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in