न्यूजक्लिककडून चिनी प्रोपगंडा

न्यूजक्लिककडून चिनी प्रोपगंडा

माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचा आरोप

नवी दिल्ली : न्यूजक्लिक डॉट इन या संकेतस्थळाकडून भारतात चीनचा प्रोपगंडा (प्रचार) केला जात असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि भाजपचे खासदार निचिकांत दुबे यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

न्यूजक्लिक डॉट इन या संकेतस्थळाची स्थापना २००९ साली ज्येष्ठ पत्रकार प्रबीर पूरकायस्थ यांनी केली. त्यासाठी अमेरिकेतील उद्योगपती नेव्हिल रॉय सिंघम यांनी अर्थपुरवठा केला. सिंघम हे जगभरात चीनच्या बाजूची माहिती प्रसारित करत आहेत. त्यांनी भारतात न्यूजक्लिकच्या माध्यमातून चिनी प्रॉपगंडा चालवला आहे, असा आरोप अनुराग ठाकूर यांनी केला.

अनुराग ठाकूर यांनी हा आरोप करताना अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रातील बातमीचा हवाला दिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी ठाकूर यांनी न्यूयॉर्क टाइम्सवरही भारतविरोधी प्रचाराचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात त्यांनी न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीवर विश्वास ठेवून न्यूजक्लिकवर चिनी प्रचाराचा आरोप केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in