
नवी दिल्ली : संसदेत झालेल्या धक्काबुक्कीचा तपास गुन्हा अन्वेषण विभाग (सीआयडी) करणार आहे. भाजप व काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर याचा तपास सुरू झाला आहे. भाजपने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर खासदारांना धक्काबुक्की केल्याचा आरोप केला. यात जखमी झालेले खासदार महेश राजपूत आणि प्रताप सारंगी यांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल व्हिडीओही तपासले जाणार आहेत. राहुल गांधी आणि अन्य खासदारांना नोटीस पाठवली जाणार आहे. त्यानंतर राहुल गांधी यांची चौकशी केली जाईल.