नागरी सहकारी बँकांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करावा,अमित शाह यांचे आवाहन

रचनात्मक बदल, मनुष्यबळाला सशक्त करणे आणि संगणकीय लेखा प्रकि्रया, तज्ज्ञांना नोकऱ्या देऊन त्यांची मदत घेणे
नागरी सहकारी बँकांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करावा,अमित शाह यांचे आवाहन

नागरी सहकारी बँकांनी पद्धतशीर विकासासाठी आणि स्पर्धेत टिकण्यासाठी अत्याधुनिक बँकिंग पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी तरुण बुद्धीवान तज्ज्ञांना नोकऱ्या द्याव्यात, असे आवाहन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

रचनात्मक बदल, मनुष्यबळाला सशक्त करणे आणि संगणकीय लेखा प्रकि्रया, तज्ज्ञांना नोकऱ्या देऊन त्यांची मदत घेणे. त्यासाठी अतिरिक्त निधीचा वापर करावा लागेल. असे केल्यास नागरी सहकारी बँकाही सरकारी आणि खासगी बँकांशी स्पर्धा करु शकतील, असे ते म्हणाले.

“शहरी सहकारी पतक्षेत्राची भविष्यातील भूमिका” या विषयावर गुरुवारी नवी दिल्ली येथे झालेल्या शेड्युल्ड आणि बहु-राज्य नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री,अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

देशात १५३४ नागारी सहकारी बँका, ५४ शेड्युल्ड नागरी सहकारी बँका, ३५ बहुराज्यीय सहकारी बँका, ५८० बहुराज्यीय सहकारी पतसंस्था, २२ राज्य सहकारी पतसंस्था आहेत. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर संस्था असल्या तरी त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण सेवा दिली जात नाही. त्यासाठी आपल्याला योग्य ते काम करुन पद्धतशीरपणे नागरी सहकारी बँकांचा विकास करावा लागेल, असे शाह म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in