आवाज खाली...चढ्या आवाजात युक्तीवाद करणाऱ्या वकिलाला सरन्यायाधीशांची तंबी; म्हणाले....

युक्तीवाद करताना वकील आपला आवाज चढवून बोलत असल्याने न्या. चंद्रचूड यांनी त्यांना आवाज न चढवण्याची तंबी दिली.
आवाज खाली...चढ्या आवाजात युक्तीवाद करणाऱ्या वकिलाला सरन्यायाधीशांची तंबी; म्हणाले....

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी बुधवारी(3 जानेवारी) न्यायालयात युक्तीवाद करणाऱ्या एका वकिलाला चांगलेच खडसावले. युक्तीवाद करताना वकील आपला आवाज चढवून बोलत असल्याने न्या. चंद्रचूड यांनी त्यांना आवाज न चढवण्याची तंबी दिली.

यावेळी न्या. चंद्रचूड म्हणाले, "तुम्ही तुमचा आवाज चढवून आम्हाला धमकावू शकत नाही. माझ्या 23 वर्षाच्या सेवेत असे झाले नाही आणि माझ्या अखेरच्या वर्षात देखील असे होऊ शकत नाही. आपला आवाज कमी ठेवा", अशी तंबीच सरन्यायाधीशांनी दिली.

सरन्यायाधीश यांनी खडसावल्यानंतर वकिलाने न्यायमूर्तींची माफी मागितली. यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना त्यांचा आवाज कमी करण्यास सांगितले आणि 'तुम्ही नेहमी न्यायाधीशांवर असे ओरडता का? तुमचा आवाज कमी करा. आता वाद घाला', असे सुनावले.

logo
marathi.freepressjournal.in