CJI DY Chandrachud:"भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकावा मात्र..." नेमकं काय म्हणाले सरन्याधीश धनंजय चंद्रचूड?

CJI DY Chandrachud:"भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकावा मात्र..." नेमकं काय म्हणाले सरन्याधीश धनंजय चंद्रचूड?

यंदाच्या विश्वचषकात भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषकाची स्पर्धेची जगभरातील क्रिकेटप्रेमी आतूरतेने वाट पाहत असतात. यावेळी या स्पर्धेचं यजमानपद हे भारताकडे आहे. या स्पर्धेत जगभरातील १० संघ सहभागी झाले आहेत. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ ची सुरुवात ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड सामन्याने झाली. यंदाच्या विश्वचषकात भारताने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत सात सामने खेळले असून सातही सामने जिंकले आहेत. दरम्यान एचटी लीडरशीप समिट २०२३ शेवटच्या सत्रात बोलताना सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मनसोक्त गप्पा केल्या.

भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकावा अशी माझी इच्छा आहे. मात्र, मला एक सांगायचं आहे की केवळ पुरुषच नाही तर महिला संघानेही यश संपादन केलं पाहिजे. मी देखील महिला संघाचा फॅन आहे. महिला संघही मला न्यायाधिश म्हणून प्रेरित करतात. त्यांचे मासिक आरोग्य आणि समता राखण्याची पद्धत मला प्रभाविक करते, असं CJI चंद्रचूड म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा शिकण्यासाठी असतो. न्यायपालिकेचा प्रमुख म्हणून माझं काम केवळ निर्णय घेणं नाही. तर न्याय व्यवस्था सुधारण हे आहे. असं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

CJI चंद्रचूड म्हणाले की, सरन्यायाधीश माणसेच असतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे आठवड्यातून २०० खटल्यांची सुनावणी करतात. अशा परिस्थितीत समतोल राखण्याचं मोठं आवाहन त्यांच्यासमोर आहे. एका बाजूला कामाचे दडपण तर दुसरीकडे मानसिक ताण असतो. न्यायाधीशांसाठी ही एक मोठी समस्या आहे. कोणत्या प्रकारचे बदल आवश्यक आहे याचा विचार करण्यासाठी न्यायाधीशांनी थोडा वेळ घेतला पाहिजे. याशिवाय दिवसातून किमान ४५ मिनिटे वाचन केलं पाहिजे. हा माझ्या जीवनाचा मंत्र आहे. मी पुस्तके वाचतो आणि संगीत ऐकतो. त्यामुळे मला खूप शांतता आणि शक्ती मिळते, असं देखील ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in