न्या. संजीव खन्ना हे आपले उत्तराधिकारी; सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केली शिफारस

न्या. खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यंत असेल. खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे.
न्या. संजीव खन्ना
न्या. संजीव खन्नाएएनआय
Published on

नवी दिल्ली: सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस गुरुवारी केंद्र सरकारकडे केली आहे.

सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आपले शिफारसपत्र न्या. संजीव खन्ना यांच्याकडे बुधवारीच सुपूर्द केल्याचे सूत्रांनी सांगितले. न्या. खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे २०२५ पर्यंत असेल.

खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले आहे. निवडणुकीत ईव्हीएमचा वापर, निवडणूक रोखे प्रकरण, अनुच्छेद ३७० रद्द करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठातील ते सदस्य होते.

logo
marathi.freepressjournal.in