न्या. बेला त्रिवेदी यांचा निवृत्ती समारंभ न केल्याने सरन्यायाधीश संतप्त

सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायाधीश बेला त्रिवेदी शुक्रवारी निवृत्त झाल्या. त्यांच्या निवृत्तीनिमित्त सुप्रीम कोर्ट बार संघाने त्यांचा निवृत्ती समारंभ आयोजित न केल्याने सरन्यायाधीश बी. आर. गवई संतप्त झाले.
न्या. बेला त्रिवेदी यांचा निवृत्ती समारंभ न केल्याने सरन्यायाधीश संतप्त
Published on

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या महिला न्यायाधीश बेला त्रिवेदी शुक्रवारी निवृत्त झाल्या. त्यांच्या निवृत्तीनिमित्त सुप्रीम कोर्ट बार संघाने त्यांचा निवृत्ती समारंभ आयोजित न केल्याने सरन्यायाधीश बी. आर. गवई संतप्त झाले. सरन्यायाधीश गवई यांनी याबाबत उघड टीका करून नाराजी व्यक्त केली.

गवई म्हणाले की, कपिल सिब्बल आणि रचना श्रीवास्तव यांचा आभारी आहे. ते या कार्यक्रमाला आले. पण, बार संघाने जी भूमिका घेतली त्यावर मला उघडपणे टीका करावी लागत आहे. निवृत्तीच्या कार्यक्रमात बार संघाने आठमुठेपणा करू नये. बार संघाने जे केले नाही, त्याची कमतरता सर्व लोकांच्या हजर राहण्यामुळे पूर्ण झाली. न्या. त्रिवेदी या चांगल्या न्यायाधीश आहेत. प्रत्येक न्यायाधीश वेगळा असतो. मात्र, त्यांचा हक्क कोणीही रोखू नये. त्यांचा सन्मान करायला हवा, असे गवई म्हणाले.

न्या. मसीह म्हणाले की, मला दु:ख होत आहे. पण परंपरेचे पालन व्हायला हवे आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे. चांगल्या परंपरा कायम राहतील, असा विश्वास मला आहे.

न्या. त्रिवेदी इमानदार व निष्पक्ष - गवई

न्या. त्रिवेदी यांचे कौतुक करताना सरन्यायाधीश म्हणाले की, त्यांनी जिल्हा न्यायालय ते सुप्रीम कोर्टापर्यंतचा प्रवास कठोर मेहनत व निष्ठापूर्वक पार केला. त्यांनी निष्पक्ष, कठोरता, सतर्कता, मेहनत, समर्पण, चिकाटी, इमानदारी व मेहनती स्वभाव कायम ठेवला.

logo
marathi.freepressjournal.in