‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला CJP चा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आ‌वाहन

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीच्या वतीने आगामी १ नोव्हेंबर रोजी आयोजित 'चलो दिल्ली' मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.
‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला CJP चा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आ‌वाहन
‘इंडिया’ आघाडीच्या मार्चला CJP चा पाठिंबा; मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे राहुल गांधींचे आ‌वाहन
Published on: 

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षांच्या 'इंडिया' आघाडीच्या वतीने आगामी १ नोव्हेंबर रोजी आयोजित 'चलो दिल्ली' मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. तसेच, काँग्रेसच्या या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) पाठिंबा दिला आहे. सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी तशी पोस्ट केली आहे.

पोलिसांची आणि त्यांच्या लाठ्यांची अजिबात चिंता करू नका, असे सांगत भाजपमध्ये असल्या प्रकारची स्टंटबाजी करण्याची हिंमत नाही, असा जोरदार हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला. रामलीला मैदानावर होणारा हा मार्च लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी, मतचोरी संपवण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मार्च कोणत्याही एका राजकीय पक्षाचा नसून, तो भारताच्या आत्म्यासाठी काढलेला लढा आहे, सर्व विद्यार्थी संघटनांनाही राजकीय पक्षांच्या वर उठून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

मोदी, शहा, ज्ञानेश कुमारांना लोक कंटाळलेत

राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि ज्ञानेश कुमार यांच्या कारभाराला कंटाळलेल्या, लोकशाही वाचवू इच्छिणाऱ्या आणि संविधानाचे रक्षण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाला मी या मार्चमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण देतो. पोलिसांची चिंता करू नका, लाठ्यांची भीती बाळगू नका, भाजपमध्ये कसलेही प्रताप करण्याची हिंमत उरलेली नाही. आमच्यासोबत चालत या, आपण संविधानाचे आणि देशाचे रक्षण करण्यासाठी एकत्र वाटचाल करूया. जर कोणाला वाटत असेल की भारतावर, त्यांच्या विचारांवर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला होतोय, तर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षभेदाशिवाय या ऐतिहासिक मोर्चानिमित्त एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)