CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) रद्द करा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टी, काँग्रेससह विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थिती
CJP चे आज देशव्यापी आंदोलन; दीपके, राकेश टिकैतसह परकला सीतारामन, प्रकाश राज यांची उपस्थितीसंग्रहित छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) रद्द करा आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागण्यांसाठी कॉकरोच जनता पार्टी, काँग्रेससह विविध संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे. नवी दिल्लीत एसआयआरविरोधात शुक्रवारी आंदोलन होणार असून त्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती आणि अर्थतज्ज्ञ परकाला प्रभाकर हे सहभागी होणार आहेत.

‘पीपल अगेन्स्ट एसआयआर’ या आंदोलनात अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांच्यासह कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके, ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा, अभिनेते आणि कार्यकर्ते प्रकाश राज आणि शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

‘एसआयआर’ रद्द करण्याची आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणे, हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असणार आहे. ‘इंडिया’ आघाडीतील पक्षांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. ‘हर हात में तिरंगा, हर गली में जंतर मंतर’, हा या आंदोलनाचा नारा असणार असून लोकशाही पुनर्स्थापित करणे हा मुख्य उद्देश आहे.

सौरव, रांका, शिंदे यांना पोलिसांचे समन्स

जंतरमंतर येथील आंदोलनप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) नेते सौरव दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांना चौकशीसाठी समन्स बजावले. राजौरी गार्डन येथील दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले होते. दास आणि रांका यांची आठवडाभर न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर बुधवारी तिहार तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर गुरूवारी दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते.

नेहा बोराच्या याचिकेवर आज निकाल

राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी नागरिकांना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनी गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयात केला. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर शांतता राखण्याचे बंधपत्र सादर करण्यास सांगणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या नोटिशीला त्यांनी आव्हान दिले आहे. या याचिकेवरील निकाल न्यायालय शुक्रवारी देणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in