शाळा पाहणीस गेलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांवर हल्ला; Video

राजस्थानमधील सरकारी शाळांच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी निघालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या पथकावर स्थानिक ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
शाळा पाहणीस गेलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांवर हल्ला; Video
शाळा पाहणीस गेलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांवर हल्ला; Video (Photo-X)
Published on

जयपूर : राजस्थानमधील सरकारी शाळांच्या दुरवस्थेची पाहणी करण्यासाठी निघालेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या पथकावर स्थानिक ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. जयपूर जिल्ह्यातील रामपुरा कंवरपुरा गावात 'स्कूल ठीक करो' मोहिमेअंतर्गत पाहणीसाठी गेलेल्या सीजेपीच्या पथकाला ग्रामस्थांनी रस्ता अडवून जबरदस्तीने माघारी परतवून लावले. या वेळी झालेल्या धुमश्चक्रीत गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून दगडफेकही झाली आहे.

या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले असून त्यामध्ये ग्रामस्थ आणि सीजेपी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची व धक्काबुक्की होत असल्याचे दिसत आहे.

शाळा पाहणीस गेलेल्या CJP च्या कार्यकर्त्यांवर हल्ला; Video
जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

आशुतोष रंका यांनी या प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी करत प्रशासनाला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.

रामपुरा कंवरपुरा येथील सरकारी शाळा मागील काही वर्षांपासून म्हशींच्या गोठ्यात भरवली जात आहे, असा आरोप सीजेपीचे सह-संयोजक आशुतोष रंका यांनी केला. ही शाळा जीर्ण घोषित झाल्याने बंद करण्यात आली होती. आम्ही जेव्हा या शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलो, तेव्हा आमच्यावर दगडफेक करून प्राणघातक हल्ला करण्यात आला, असा दावा करून ते म्हणाले की, महिला कार्यकर्त्यांशी गैरवर्तन करण्यात आले, मोबाईल फोडले गेले आणि गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. राजस्थानचे शिक्षण मंत्री मदन दिलावर यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला आहे.

म्हशींच्या गोठ्यात शाळा

सरकारी शाळेची इमारत 'धोकादायक' घोषित करण्यात आल्याने विद्यार्थ्यांसाठी ती बंद करण्यात आली आहे. सध्या ही शाळा जवळच असलेल्या एका गुरांच्या गोठ्यात भरवली जात आहे, असे सीजेपीचे म्हणणे आहे. तर स्थानिक ग्रामस्थांच्या मते, शासनाने या शाळेच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर केला असून स्थानिक पातळीवर हे काम केले जाऊ शकते.

पोलिस कोणाचे रक्षक- दीपके

या घटनेनंतर सीजेपीचे संयोजक अभिजीत दीपके यांनी शुक्रवारी राजस्थान पोलिसांवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. सरकारी शाळांची पाहणी करणाऱ्या सीजेपी कार्यकर्त्यांवर गुंड हल्ला करत असताना राजस्थान पोलीस गप्प बसून होते असा आरोप करून ते म्हणाले की, म्हशींच्या गोठ्यात भरणाऱ्या शाळांबद्दल पोलिसांना काहीच आक्षेप नाही, पण सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाण्यावर मात्र त्यांचा आक्षेप आहे. पोलीस नक्की कोणाचे रक्षण करत आहेत असा सवाल त्यांनी केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in