कोलम : मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसपुढे काळे झेंडे दाखविल्यामुळे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि केरळ स्टुडंट्स युनियनच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष धाला.
सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न असलेल्या डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविणाऱ्यांना रोखले व त्यावेळी भर रस्त्यावरच हाणामाऱ्या झाल्या. वर्दळीच्या रस्त्यावर काठ्यांनी मारामारी झाली व सोशल मीडियावरही ही मारामारी व्हायरल झाली. पोलिसांनी निदर्शकांना अटक केली असल्याचे सांगम्यात आले.