Video : भारतासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर मालदीवच्या संसदेत हाणामारी; खासदारांच्या 'कुस्ती'चे व्हिडिओ व्हायरल

अधाधु हे मालदीवमधील ऑनलाइन न्यूज आउटलेट आहे. त्यावर या हाणामारीची दृष्ये प्रसारीत झाली आहेत.
Video : भारतासोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर मालदीवच्या संसदेत हाणामारी; खासदारांच्या 'कुस्ती'चे व्हिडिओ व्हायरल

माले : मालदीवच्या संसदेत रविवारी खासदारांची हाणामारी झाली. खासदार एकमेकांना ओढताना, लाथाबुक्क्या मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाले आहेत. मालदीवच्या संसदेत रविवारी अध्यक्ष मोहम्मद मुईझू यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला जाणार होता. संसदेत कामकाज सुरू असताना सत्ताधारी खासदारांनी कामात व्यत्यय आणला. सत्ताधारी पीपीएम आणि पीएनसी या पक्षांच्या आघाडी सरकारविरुद्ध विरोधी एमडीपी पक्षाने अविश्वास ठराव आणला होता. त्यावर रविवारी मतदान होणार होते. दुपारी दीड वाजता मंत्र्यांची मंजुरी निश्चित करण्यात आली होती. तथापि, अनेक पीएनसी सदस्यांनी सभागृहात अडथळा आणला आणि अधिवेशनात व्यत्यय आणला. तेव्हा खासदारांत मारामारी झाली.

अधाधु हे मालदीवमधील ऑनलाइन न्यूज आउटलेट आहे. त्यावर या हाणामारीची दृष्ये प्रसारीत झाली आहेत. त्यानुसार एमडीपी खासदार इसा आणि पीएनसी खासदार अब्दुल्ला शाहीम अब्दुल हकीम यांच्यातील लढत दिसली. अधाधुच्या म्हणण्यानुसार, एका व्हिडिओमध्ये शहीम यांनी इसा यांचा पाय पकडला आहे आणि दोघे एकत्र पडत आहेत. तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या आणखी एका व्हिज्युअलमध्ये इसा शहीम यांच्या मानेला लाथ मारत आहेत आणि त्यांचे केस ओढत आहेत. फुटेजमध्ये इतर सदस्य शहीम यांना संसद परिसरातून बाहेर ढकलताना दिसत आहेत. एका संसद सदस्याला दुखापत झाल्यानंतर रुग्णवाहिकेत आणण्यात आले, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप भेटीनंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी यांच्याविरोधातील वक्तव्ये केली होती. त्याबद्दल मालदीवच्या तीन मंत्र्यांची हकालपट्टी झाली होती. तेव्हा मालदीवच्या विरोधी पक्षांनी सत्ताधारी मुईझू सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याची घोषणा केली होती. त्यानुसार रविवारी या ठरावावर मतदान होणार होते. तेव्हाच हाणामारी झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in