Madhya Pradesh: आठवीतील विद्यार्थिनी गरोदर, चुलत भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Bhopal: हा तरुण गेल्या चार महिन्यांपासून १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता अशी, माहिती समोर आली आहे.
Madhya Pradesh: आठवीतील विद्यार्थिनी गरोदर, चुलत भावावर बलात्काराचा गुन्हा दाखल

13-year-old girl was found pregnant: मध्यप्रदेशमधील एका १३ वर्षीय मुलीने पोटदुखीची तक्रार केल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याच तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे आढळून आले, असे पोलिसांनी बुधवारी सांगितले. मुलीच्या स्टेटमेंटनुसार, रतीबाद पोलिसांनी तिच्या दूरच्या चुलत भावावर गुन्हा दाखल केला आहे. या भावाने रतीबाद गावात असलेल्या तिच्या घरी चार महिन्यांहून अधिक काळ वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सध्या आरोपी फरार असून त्याला पकडण्यासाठी शोध सुरू करण्यात आला आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, इयत्ता आठवी मधील विद्यार्थिनीला दोन दिवसांपूर्वी पोटदुखीचा त्रास जाणवू लागला होता. यानंतर तिचे पालक तिला मंगळवारी रात्री डॉक्टरांकडे घेऊन गेले. वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांना ही मुलगी गरोदर असल्याचे आढळून आली. ही माहिती डॉक्टरांनी तिच्या पालकांना माहिती दिली.

यानंतर मुलीने, तिच्या पालकांनी समुपदेशन केल्यावर, तिने सांगितले की तिचा एक लांबचा भाऊ तिच्या घरी गेल्या चार महिन्यांपासून तिच्यावर बलात्कार करत आहे. तो तिकडे वारंवार येत होता अशी माहितीही सांगितली. मुलीने तिच्या पालकांना असेही सांगितले की जेव्हा जेव्हा त्याने बलात्कार केला तेव्हा तेव्हा त्याने तिला ही घटना कोणाला सांगण्याचे धाडस केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली. हे सगळं समजल्यावर मुलीच्या पालकांनी बुधवारी रतीबाद पोलिसांशी संपर्क साधला आणि २१ वर्षीय आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.

पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) कायदा आणि आयपीसीच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा मूळचा विदिशा शहरातील रहिवासी आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यानंतर पोलिस लवकरच आरोपीला अटक करतील, असे या घटनेची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in