नवी दिल्ली : सध्या सूर्य आग ओकतोय. महाराष्ट्रसह संपूर्ण देशात किमान तापमान ४० ते ४७ अंशाच्या दरम्यान गेले आहे. उष्णतेच्या लाटा येत आहेत. या बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका मेंदूच्या कार्यावर होत असल्याचे एका संशोधनातून उघड झाले आहे. मायग्रेन व अल्झायमर आदींचा त्रास या उष्णतेमुळे होऊ शकतो, असे नवीन संशोधन ‘लॅन्सेट न्यूरॉलॉजी जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.
यंदा मार्चपासून उन्हाचे चटके बसू लागले. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. त्याचा परिणाम माणसाच्या कार्यक्षमतेवर होत आहे. वातावरण बदलामुळे दिवसाच्या तापमानात लक्षणीय कमी-जास्तपणा होत आहे. यामुळे मेंदूच्या आजारांमध्ये मोठी वाढ झाली आहे, असे ‘युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज लंडन’च्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरॉलॉजी (ब्रिटन)मधील संशोधक संजय सिसोदिया यांनी सांगितले.
सकाळच्या तापमानापेक्षा रात्रीचे तापमान अधिक महत्त्वाचे आहे. रात्री तापमान वाढल्यास त्याचा परिणाम झोपेवर होत असतो. झोप खराब झाल्यास त्याचा मेंदूवर परिणाम होतो, असे ते म्हणाले.
१९६८ ते २०२३ दरम्यान जगभरात ३३२ संशोधनाचा अभ्यास केला. त्यात १९ वेगवेगळ्या मज्जारज्जूच्या आजारांवर संशोधनाचा आढावा घेतला. त्यात पक्षाघात, अल्झायमर, एपिलेप्सी आदींचा समावेश होता. स्मृतिभ्रंशाचा आजार असणाऱ्या रुग्णांवर तापमानवाढीचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. महापूर, मोठे वणवे आदींमुळे हे बदल संमिश्र पानावर
उत्तरेत पाच दिवस उष्णतेची लाट
उत्तर भारतात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. याचा प्रकोप आणखी पाच दिवस राहणार आहे. दिल्लीतील नजफगड येथे शुक्रवारी ४७.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. वायव्य भारतात पाच दिवस, तर पूर्व व मध्य भारतात तीन दिवस उष्णतेच्या लाटा उसळणार आहेत, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. दिल्ली, हरयाणा, पंजाब व प. राजस्थानात उष्णतेच्या लाटा येतील. अमेरिकेतील ‘क्लायमेट सेंट्रल’ या हवामान शास्त्रज्ञांच्या गटाने सांगितले की, भारतातील ५४.३ कोटी नागरिकांना १८ ते २१ मे दरम्यान कडक उन्हाचा झटका बसणार आहे.